तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ » Poetry » ..आणि तरीही मी!

..आणि तरीही मी!

Rated 5/5 based on 1 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

 'आणि तरीही मी’ हा सौमित्र यांचा पहिलाच कवितासंग्रह. या काव्यसंग्रहातील कविता सौमित्रने मराठी काव्याची परंपरा पूर्णपणे झुगारून देऊन, स्वत:च्या स्वतंत्र अभिव्यक्तीतून घडवलेल्या कविता आहेत. यातील कविता कुठेच छंदोबध्द नाहीत, वृत्तबध्द नाही, नवकवितेप्रमाणे ती छंदमुक्त असली तरी ती नवकविताही नाही. मराठी काव्यातल्या कुठल्याही काव्यरचनेच्या प्रकाराशी तिचे साम्य नाही. त्यांनी घडवलेला कवितांचा घाट हा सर्वस्वी त्यांचा आहे. त्यांची कविता वास्तवातल्या दु:खद जिण्याला निकटपणे भिडलेली कविता आहे. तिचा मूळ गाभा वैयक्तिक जीवनानुभवाचा असला तरी मुंबईतल्या शहरी, यांत्रिक, साचेबंद जीवनाचा संदर्भ तिच्याभोवती जागा आहे.

‘...आणि तरीही मी’ या कवितासंग्रहाचे कवीने चार भाग पाडले आहेत. ‘व्हिन्सेंटच्या कविता’ या पहिल्या भागात चित्रकला आहे, ‘स्पॉटलाईटच्या कविता’ या दुसर्‍या भागात नाटक  आहे, ‘सुमित्राच्या कविता’ या तिसर्‍या भागात प्रेम आहे तर ‘...आणि तरीही मी’ या चौथ्या भागात आत्मगते आहेत. या कवितासंग्रहाने महाराष्ट्र राज्य पुरस्कार, कविता राजधानी पुरस्कार, विशाखा पुरस्कार आणि इतर अनेक  पुरस्कार मिळवलेले आहेत. 

Save

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

ISBN :

978-81-7991-901-9

स्वरूप :

Soft Cover

आकार:

5.5" x 8.5"

MRP:

`375

सूट :

20%

किंमत :

`300

Buy Now

सौमित्र

सौमित्र म्हणजेच किशोर कदम हे मुख्यत: कवी म्हणून ओळखले जात असले तरी त्यांनी चार एकांकिका लिहिल्या आहेत, ‘गारवा’, ‘सांज होता सखे’, ‘दिस नकळत जाई‘ आणि ‘सांजगारवा’ या त्यांच्या ध्वनिफिती प्रसिध्द आहेत.

Read More

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top