तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ » Arts » हिंदुस्थानी संगीत पद्धती

हिंदुस्थानी संगीत पद्धती

Rated 5/5 based on 1 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

पंडित विष्णु नारायण भातखंडे यांनी लिहिलेले भारतीय संगीतावरचे हे पाच खंड. 1914 साली ते मूळ चार खंडांत प्रकाशित झाले होते. प्रभाकर चिंचोरे यांनी त्यांचे संपादन करून त्यांत अनेक उपयुक्त माहितीची भर घालून 1992 साली पाॅप्युलरने ते पाच खंडांत प्रसिद्ध केले. भारतीय संगीताच्या अभ्यासकांकडून या पुस्तकांना चांगलाच प्रतिसाद मिळाला. गेली अनेक वर्षं दुर्मीळ झालेल्या हा संच भातखंडे यांच्या स्मृतिदिनाचे निमित्त साधून 19 सप्टेंबर रोजी प्रकाशित होत आहे.
"आपल्या संगीताचा इतिहास सामवेदाच्या वेळच्या संगीतापासून प्रारंभ करून आताच्या विसाव्या शतकापर्यंत पोहचविता आला तर केवढे उपयोगी काम पार पडेल बरे?" या विचारातून भातखंडे यांनी हिंदुस्थानच्या वेगवेगळ्या भागांत प्रवास केला. अनेक दुर्मीळ ग्रंथ मिळवून त्यांच्या संहिता स्वतः छापून काढल्या. अनेक संगीतकारांकडून चिजा मिळवल्या. त्या ग्रंथबद्ध करता याव्यात म्हणून नोटेशन पद्धती निर्माण केली. काही चिजा स्वतः लिहिल्या. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला प्रचलित असलेल्या संगीत पद्धतीची शास्त्रीय बैठक पक्की करण्यासाठी 'श्रीमल्लक्षसंगीतम्' हा संस्कृत ग्रंथ आणि त्यावरची मराठी टीका शब्दबद्ध केली. तीच या पाच खंडांत आली आहे.

Save

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

ISBN :

978-81-7185-617-6

स्वरूप :

Hard Cover

आकार:

5.5"x8.5"

MRP:

`4000

सूट :

25%

किंमत :

`3000

Buy Now

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top